मालवण/प्रतिनिधी:-
अ.शी.दे .टोपीवाला हाय स्कूल मध्ये सहा.शिक्षिका म्हणून गेली वीस वर्षे कार्यरत असलेल्या सौ.ज्योती रविकिरण बुवा-तोरसकर यांनी राज्यस्तरीय सहा.प्राध्यापक पदासाठी झालेल्या(सेट)परीक्षेत, मराठी या विषयात यश मिळवले आहे.यापूर्वी झालेल्या सेट परीक्षेत इतिहास या विषयात त्याना यश मिळाले होते.मराठी व इतिहास या दोन्ही विषयात यश मिळवणाऱ्या काही मोजक्या व्यक्ती मध्ये त्यांचा समावेश झाला आहे.सदर परिक्षा ही युजीसी व सावित्रीबाई फुले विद्यापीठ,पुणे तर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यासाठी घेतली जाते.ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या सदर परीक्षेसाठी गोवा तसेच महाराष्ट्र मधून ७९७७५ बसले होते त्यापैकी ५२९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ६.६४% एवढा लागला आहे.सदर परीक्षेत मराठी पाठोपाठ इतिहास या विषयात सौ.ज्योती रविकिरण बुवा-तोरसकर यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद असून.आपल्या स्पर्धा परीक्षेतील अनुभवाचा फायदा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या बद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.