झेब्रा क्रॉसिंगचे आरेखन नसल्याने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन
बेळगावः शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत काँक्रिटचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनधारकांचा प्रवास सुखकर झाला आहे. मात्र शहरातील चौकाचौकात या रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंगच्या पट्टय़ांचे आरेखन करण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पादचाऱयांना रस्ता ओलांडताना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
शहरातील कॉलेज रोड, क्राँग्रेस रोड, आंबेडकर रोड, न्यायालय रोड, जुना पी. बी. रोड आदी रस्ते काँक्रिटचे करण्यात आले आहेत. मात्र शहरातील मुख्य चौकात असलेल्या सिग्नलजवळ झेब्रा क्रॉसिंगच्या पट्टय़ांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. सिग्नल सुरू झाल्यास पादचारी रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगचा वापर करतात. मात्र तयार करण्यात आलेल्या काँक्रिटच्या रस्त्यावर अद्याप झेब्रा क्रॉसिंगचे आरेखन करण्यात आले नाहीत. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. पादचाऱयांच्या सोयीखातर सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंगच्या पांढऱया रंगाच्या पट्टय़ा आखल्या जातात. यावरून पादचाऱयांनी ये-जा करावी, असा नियम आहे. मात्र काँक्रिटच्या रस्त्यावर अद्याप झेब्रा क्रॉसिंगच्या पट्टय़ा आखण्याकडे दुर्लक्ष झाल्याने पादचारी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून ये-जा करताना दिसत आहेत. शिवाय भरधाव धावत असल्याने अपघाताचा धोकादेखील उद्भवू शकतो. यासाठी तातडीने सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंगच्या पट्टय़ांचे आरेखन करावे, अशी मागणी होत आहे.