21 हजार भरुन करा बुकिंग : किंमत 8 लाखावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाटाने आपल्या नव्या अल्ट्रोझ डीसीए कारचे लाँचिंग नुकतेच केले असून या गाडीच्या बुकिंगलाही प्रारंभ झाला असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. ही गाडी बलेनो, आय ट्वेंटी, झॅझ व ग्लांझा यांना टक्कर देईल असे सांगितले जाते.
अल्ट्रोझ डीसीए या नव्या कारची किंमत 8 लाख 10 रुपये इतकी असणार असून गाडी बुक करायची झाल्यास ग्राहकांना 21 हजार रुपये आगाऊ भरावे लागणार आहेत. लवकरच या गाडीच्या डिलिव्हरीसही प्रारंभ होणार असून हॅचबॅक गटातील टॉप व्हेरियंटच्या गाडीची किंमत मात्र 9 लाख 90 हजार रुपये इतकी असणार असल्याचे समजते. अल्ट्रोझ डीसीए (डय़ुअल क्लच ऑटोमेटीक) वेट-क्लच तंत्रज्ञानासह येणार असून 1.2 लिटर रिवोट्रोन पेट्रोल इंजिन याला असेल जे 86 एचपी इतकी शक्ती प्रदान करेल. रेड, व्हाइट, ग्रे, ब्ल्यूसह ओपेरा ब्ल्यू रंगात ही गाडी येणार आहे. या गाडीत नवा गिअरबॉक्स दिला गेला आहे. ऑटो पार्क लॉक फीचरची जोड या गाडीत असून एक्सएमए प्लस, एक्सटीए, एक्सझेडए व एक्सझेड प्लस अशा प्रकारात ही गाडी विक्रीकरीता उपलब्ध असेल.
इतर वैशिष्टय़े
w 7 इंच टचस्क्रीन सिस्टम (ऍपल कार प्ले व अँड्रॉइड ऑटो)
w सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनेल
w ऑटोमेटिक एअर कंडिशनिगं
w रेन सेन्सींग वाइपर्स
w ऑटोमेटिक हेडलॅम्पस
w डय़ुअल एअरबॅग्ज
w रिव्हर्स पार्किंग कॅमेरा