वृत्तसंस्था /नवी दिल्ली
टाटा कम्युनिकेशन्सचा डिसेंबर 2021 मध्ये समाप्त झालेल्या चालू आर्थिक वर्षातील तिसऱया तिमाहीतील निव्वळ नफा हा 27.8 टक्क्यांनी वधारुन 395.21 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. याच्या अगोदरच्या आर्थिक वर्षातील समान तिमाहीत कंपनीने 309.41 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता.
टाटा कम्युनिकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस. लक्ष्मीनारायणने म्हटले आहे, की तिमाहीच्या आधारे आम्ही सकारात्मक कामगिरी केली असून यामध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मच्या कामगिरीतून अधिक फायदा झाल्याची नोंद केली आहे. दुसऱया बाजूला कंपनीच्या उत्पन्नात मात्र 4,203.69 कोटी रुपयांची घट झाली आहे.