समूहाच्या 29 कंपन्या शेअर बाजारात लिस्ट
वृत्तसंस्था/मुंबई
टाटा समूहाजवळ एकूण 8 लाख कर्मचारी आहेत. 1868 रोजी या समूहाची सुरुवात जमशेदजी टाटा यांनी केली होती. 10 व्हर्टिकलमध्ये 30 कंपन्या आहेत. ज्यामध्ये 29 शेअर बाजारात लिस्टेड आहेत. 100 देशांमध्ये या कंपन्यांचा व्यवसाय कार्यरत आहे. टाटा सन्स सर्व कंपन्यांची मुख्य कंपनी आहे. 2021 मध्ये समूहाचा महसूल 7.7 लाख कोटी रुपये राहिला असल्याची माहिती आहे.
154 वर्ष जुना समूह म्हणून ओळख असणाऱया टाटा समूहामध्ये एन. चंद्रशेखरन हे मागील 34 वर्षांपासून कार्यरत आहेत. टाटा समूहाच्या संचालक मंडळाने एन. चंद्रशेखरन यांना पुन्हा पाच वर्षांसाठी टाटा सन्सचे अध्यक्ष बनविले आहे. त्यामुळे त्याचा कार्यकाल हा 2027 पर्यंत कायम राहणार आहे. ते 2017 रोजी पहिल्यांदा अध्यक्ष बनले होते. चंद्रशेखरन यांच्या कालावधीत टाटा समूहाने मजबूत कामगिरी केली आहे.
कुटुंबा बाहेरील पहिले अध्यक्ष
1988 मध्ये एन. चंद्रशेखरन यांनी आयआयएम कोलकाता येथून एमबीए केल्यानंतर ते टाटा समूहासोबत जोडले आहेत. पहिल्यांदा ते टीसीएसमध्ये ट्रेनी म्हणून रुजू झाले आहेत. तसेच ते या समूहाचे अध्यक्ष बनणारे पहिले टाटा कुटुंबाच्या बाहेरील व्यक्ती आहेत.