ऑनलाईन टीम / सातारा :
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत खटाव सोसायटी मतदारसंघात बंडखोर माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी कोणत्याही नेत्याचे पाठबळ नसताना स्वतःच्या ताकदीवर राष्ट्रवादीच्याच नेत्याचा पराभव केला. घार्गे यांना 56 मते मिळाली असून, त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार नंदकुमार मोरे यांचा 10 मतांनी पराभव केला आहे.
राष्ट्रवादीचे प्रभाकर घार्गे हे खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी बंडखोरी करत जिल्हा बँकेसाठी अर्ज दाखल केला होता. तुरुंगात असतानाही त्यांनी नंदकुमार मोरेंना पराभूत केले. मोरे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खटावमधून उमेदवारी दिली होती. त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी हा धक्कादायक पराभव मानला जात आहे.