वार्ताहर / टाेप
टाेप ता. हातकणंगले येथील गट नंबर१२७४/१ ही गायराण जमिन असुन या जमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रमणे हटविण्याबाबत टाेपमधील अक्षय पाटील, अनिकेत गुरव व विकास पाटील यांनी टाेप ग्रामपंचायत समाेर उपाेषण सुरु केले आहे.
गायराण गट नं १२७४/१ या गटातील १५ हेक्टर ४१ आर जमीन हि जमीन महसुल विभागाने जि.प ग्रामपंचायत विभागाकडे देखभाल करण्यासाठी दिली आहे. पण या गटात बेकायदेशीर अतिक्रमणे वाढल्याने त्यावर काेणतीही कारवाई हाेत नाही. अशा वांरवार तक्रारी हाेवुन सुध्दा याकडे लक्ष नसल्याचे दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे.
टाेप ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी यांनी उपोषण मागे घेण्यासंदर्भात गट नं. १२७४ अ मध्ये गाेपाळ समाजास वसंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत ३० घरकुले मंजुर केलेली आहेत. या जागेची पाहणी करण्याकरीता जिल्हाधिकारी व तहसिलदार यांनी भेट देवुन पाहणी केली असता इतर पक्की घरांची माहिती घेवुन अनधिकृत घरे निष्काशित करण्यासाठि पाेलीस बंदाेबस्त मागवुन निष्कासित करावे अशा तोंडी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सर्वांना पत्रव्यवहार करून कळविलेले आहे.यावर सरपंच उपसरपंच यांनी सदर गट नंबर हा न्याय प्रविष्ट बाब असल्याने वरिष्ठांचा लेखी आदेश घेऊन आम्ही अतिक्रमणे निष्काशित करू असे लेखी पत्र व ग्रामपंचायतीने काही अतिक्रमणावर कारवाई केलेली आहे अशी माहिती उपोषणकर्त्यांनी दिली आहे.