
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
अनगोळ येथील संत मीरा शाळेच्या मैदानावर टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना आयोजित संत मीरा शाळेच्या 40 व्या वर्षपूर्तीनिमित्त बेळगाव शहर शिक्षकांच्या सांघिक क्रीडा स्पर्धांत व्हॉलीबॉलमध्ये टिळकवाडी विभागाने नॉर्थ झोनचा तर महिलांच्या थ्रोबॉल स्पर्धेत सेंट पॉल्सने डीपी संघाचा पराभव करुन हनुमान चषक पटकाविला.
सदर स्पर्धेत पुरुषांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत पहिल्या उपांत्य सामन्यात टिळकवाडी विभागाने पंडित नेहरू संघाचा 25-22, 17-25, 15-12, दुसऱया उपांत्य सामन्यात नॉर्थ विभागाने कॅन्टोन्मेंट संघाचा 25-20, 22-25, 15-11, तर अंतिम फेरीत टिळकवाडी विभागाने नॉर्थ विभागाचा 25-21, 25-20 अशा सेट्समध्ये पराभव करुन विजेतेपद पटकाविले.
महिलांच्या थ्रोबॉल स्पर्धेत पहिल्या सामन्यात सेंट पॉल्स संघाने मराठी विद्यानिकेतनचा 21-18, 21-19 तर दुसऱया उपांत्य सामन्यात डीपीने शानभाग स्कूल संघाचा 21-15, 21-17 अशा सेटमध्ये पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात सेंट पॉल्स संघाने डीपी संघाचा 21-17, 21-18 अशा सेटमध्ये पराभव करुन विजेतेपद पटकाविले. या दोन्ही संघांनी शिक्षकांच्या स्पर्धेतील सलग दुसऱया विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला.
स्पर्धेनंतर प्रमुख पाहुणे संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, पुरस्कर्ते विमल फाउंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव, हनुमान स्पोर्ट्सचे संचालक आनंद सोमनाचे, अस्मिता इंटरप्राईजेसचे संचालक राजेश लोहार, माधुरी जाधव, ए. बी. शिंत्रे, उपमुख्याध्यापिक ऋतुजा जाधव, स्पर्धा अध्यक्ष विवेक पाटील, सीआर पाटील या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात
आले.
स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसे उत्कृष्ट थ्रोवर नीता तुक्मकार, उत्कृष्ट कॅचर सिलविया डिलिमा, उत्कृष्ट डिफेंडर विनायक डिचोलकर, उत्कृष्ट स्मॅशर श्रीधर हिरेमठ, उत्कृष्ट लिफ्टर विनायक कंग्राळकर, शिस्तबद्ध संघ संत मीरा, कॅन्टोन्मेंट यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून क्रीडाशिक्षक शंकर कोलकार, एच. एस. सिंगाडे, उमेश मजुकर, उमेश बेळगुंदीकर, जयसिंग धनाजी, सचिन कुडची, श्रीहरी लाड, बीजी सोलोमन, पूजा मुचंडी, अंकिता पाटील, मयुरी पिंगट यांनी काम पाहिले.