ऑनलाईन टीम / मुंबई :
टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांनी परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरे यांच्यासह बेंगळूरमधून जीए टेक्नॉलॉजीचा प्रमुख अश्विन कुमारला अटक केली आहे.
म्हाडा आणि टीईटी परीक्षांमध्ये गुप्तता भंग झाल्यानंतर सुरू झालेल्या पोलीस तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. परीक्षा परीषदेचा आयुक्त तुकाराम सुपे याच्यापासून सुरू झालेल्या घटनेतील आरोपींची संख्या आता पाचवर पोहचली आहे. परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरे यांना संगमनेर तालुक्यातील त्यांच्या मूळ गावातून पोलिसांनी अटक केली आहे. अश्विन कुमार हा आधीपासून या प्रकरणात अटकेत असलेल्या प्रितेश देशमुखचा वरिष्ठ आहे. तर सुखदेव डेरे हे 2017 साली जेव्हा जीए टेक्नॉलॉजीला शिक्षण परिषदेकडून परीक्षा घेण्याचे कंत्राट मिळाले होते, तेव्हा शिक्षण परिषदेचे आयुक्त होते. या सगळय़ांनी मिळून 2018 साली झालेल्या टीईटी परीक्षेतही अशाचप्रकारे अपात्र उमेदवारांना पात्र ठरवल्याचे समोर आले आहे.