दिवसभरात 476 नवे कोरोनाबाधित, 2 बळी
प्रतिनिधी / पणजी
गेल्या 24 तासात म्हणजे सोमवारी कोरोनामुळे 2 बळी गेले असून एकुण मृतांचा आकडा 850 झाला आहे. काल नवीन 476 रुग्ण कोरोनाबाधित झाले असून 231 जण बरे होऊन घरी परतले तर सक्रिय रुग्णांची संख्या 4565 वर पोहोचली आहे. संशयित रुग्ण म्हणून 68 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले असून 246 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. आतापर्यंत एकुण 62780 जणांना कोरोनाची बाधा झाली होती, त्यातील 57365 जण कोरोनामूक्त त्यातून मुक्ती मिळाली आहे. दरम्यान ‘टीका उत्सव’ मोहिमेला काल सोमवारीही चांगला प्रतिसाद लाभला.
विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. डिचोली – 95, सांखळी – 121 पेडणे – 84, वाळपई – 39, म्हापसा – 297, पणजी – 307, हळदोणा – 78, बेतकी – 32, कांदोळी-337, कासारवर्णे-19, कोलवाळ- 67, खोर्ली- 109, चिंबल-141, शिवोली- 147, पर्वरी- 499, मये- 32, कुडचडे- 69, काणकोण-71, मडगांव- 466, वास्को- 227, बाळ्ळी-48, कासावली- 130, चिंचिणी- 68, कुठ्ठाळी- 274, कुडतरी- 66, लोटली- 64, मडकई- 29, केपे- 22, सांगे- 90, शिरोडा- 61, धारबांदोडा-52, फोंडा- 340, नावेली- 66, पर्वरी आरोग्य केंद्रात सर्वाधिक रुग्ण असून ते पाचशेला 499 टेकले आहेत. शिवाय विविध मार्गाने गोव्यात आलेले 18 प्रवासी पर्यटक कोरोनाबाधित सापडले आहेत.
- 12 एप्रिलपर्यंतचे एकुण रुग्ण- 62780
- 12 एप्रिलपर्यंतचे बरे झालेले रुग्ण- 57365
- 12 एप्रिलपर्यंतचे सक्रिय रुग्ण- 4565
- 12 एप्रिल रोजीचे नवीन रुग्ण- 476
- 12 एप्रिल रोजी बरे झालेले रुग्ण- 231
- 12 एप्रिल रोजी बळी-2
- आतातर्यंतचे एकुण बळी- 850