नवी दिल्ली
सदुचाकी विक्रीतील आघाडीवरची कंपनी टीव्हीएसला एप्रिलमध्ये वाहन विक्रीत 26 टक्के इतकी घट दिसून आली आहे. कंपनीने एप्रिल महिन्यात 2 लाख 38 हजार 983 वाहनांची विक्री केली आहे. याच तुलनेत मार्चमध्ये कंपनीने 3 लाख 22 हजार 683 वाहनांची विक्री केली होती. स्थानिक स्तरावर दुचाकी विक्री ही एप्रिल महिन्यात 1 लाख 31 हजार 386 इतकी राहिली आहे. मार्चमध्ये 2 लाख 2 हजार 155 दुचाकींची विक्री झाली होती. त्या तुलनेत एप्रिलमधील विक्री पाहता 35 टक्के कमीच आहे. मागच्या वर्षी राष्ट्रीय लॉकडाऊनमुळे एप्रिलमध्ये पहिल्यांदाच एकही गाडी विक्री झालेली नव्हती.