स्पाय बहूच्या प्रोमोमध्ये दिसली झलक
करिना कपूर बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि महागडय़ा अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे. अभिनेत्रीचे चाहते तिला चित्रपटांसह अन्य प्लॅटफॉर्म्सवरही पाहण्यासाठी उत्सुक आहेत. करिनाच्या चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. करिना टीव्हीवर पदार्पण करत आहे. स्पाय बहू या शोमध्ये ती सूत्रसंचालिका म्हणून दिसून येणार आहे.

स्पाय बहूचा एक प्रोमो कलर्स वाहिनीकडून जारी करण्यात आला आहे. यात करिना कपूरला शे नरेट करताना पाहिले जाऊ शकते. करिनाने अलिकडेच याचे चित्रिकरण केले होते. जगातील प्रत्येक प्रेमकथेची सुरुवात अशीच होते असे यात ती म्हणताना दिसून येते. करिना कपूरचे काही चाहते आनंदी आहेत. तर काही निराश आहेत, कारण अभिनेत्री या शोमध्ये व्यक्तिरेखा साकारत नसून केवळ नरेटर म्हणून जोडली गेलेली आहे.