प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे शनिवारी जीएसटी ऑडिट या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जीएसटी विभागाच्या सहआयुक्त यास्मिन बेगम वालीकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी असोसिएशनचे कौतुक करत जीएसटीबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी हुबळी येथील सीए विनय कुलकर्णी यांनी जीएसटी ऑडिट व येणाऱ्या समस्या या विषयीची माहिती दिली. अध्यक्ष जितेश कब्बूर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी उपाध्यक्षा महांतेश दडगुंडी, सेक्रेटरी भरतेश मुरगुंडे, खजिनदार टी. मलगी, सहसेक्रेटरी विक्रम कोकणे यासह हुबळी, बेळगाव, गदग येथून मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते.