प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र येथील लोकस्वराज्य फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन टेड युनियन संघटनेच्या कर्नाटक राज्याध्यक्षपदी व दक्षिणेकडील प्रमुखपदी बेळगावचे अभिनेते राज के. पुरोहित यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे बेळगावच्या कलेला वाव मिळणार आहे.
युनियनचे अध्यक्ष अभिजित खरे व राष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत खानविलकर यांनी नियुक्तीचे पत्र अभिनेता राज के. पुरोहित यांना पाठविले आहे. पुरोहित यांनी हिंदी चित्रपटांतून आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली आहे. तसेच चित्रपट क्षेत्राविषयीच्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन ही नेमणूक करण्यात आली आहे. बेळगावच्या कला क्षेत्रातून पुरोहित यांचे कौतुक होत आहे.