अमेरिका वर्णद्वेषी देश नसल्याची टिप्पणी : आरएनसीत संबोधन
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत यंदा भारतीय वंशाच्या मतदारांचे महत्त्व मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. कमला हॅरिस पहिल्या बिगरश्वेतवर्णीय आणि भारतीय-अमेरिकन महिलेच्या स्वरुपात उपाध्यक्षपदाच्या दावेदार ठरल्या आहेत. आणखी एका भारतीयाने स्वतःचे महत्त्व अधोरेखित केले आहे. रिपब्लिकन नॅशनल कन्वेंशनच्या (आरएनसी) प्रारंभिक सत्रात संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या माजी प्रतिनिधी तसेच भारतीय वंशाच्या नेत्या निक्की हेली यांनी भाषण करत डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा संधी देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
डेमोपेटिक पार्टीचे अध्यक्षीय उमेदवार ज्यो बिडेन हे डाव्या विचारसरणीकडे झुकलेले आहेत असे म्हणत हेली यांनी ट्रम्प यांच्यावर वर्णद्वेषाचा आरोप करणाऱयांना प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिका हा वर्णद्वेष करणारा देश नाही. मी भारतीय स्थलांतरितांची मुलगी असून त्याबद्दल मला गर्व आहे. माझ्या आईवडिलांनी कधीच घृणास्पद वागणुकीला तोंड दिलेले नाही. कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीयांच्या जगात मी एक भारतीय मुलगी होते असे हेली यांनी म्हटले आहे.
ट्रम्प हे धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षक असल्याचे या परिषदेत रिपब्लिकन नेत्यांनी म्हटले आहे. परिषदेत अमेरिकेच्या राजकारणात भारतीय वंशीयांचा सहभाग सातत्याने वाढत असल्याचे मत व्यक्त झाले आहे.
अमेरिकेच्या कॅबिनेटमध्ये सेवा बजावणाऱया हेली या पहिली भारतीय वंशीय नेत्या ठरल्या होत्या. 2010 मध्ये दक्षिण कॅरोलिनाच्या गव्हर्नरपदी निवडून येणाऱया त्या पहिल्या महिला तसेच बिगरश्वेतवर्णीय नेत्या होत्या. 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टीच्या त्या उमेदवार ठरू शकतात.