क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
ट्राय गोवाने आयोजित केलेली 300 किलोमीटरची सायकल राईड ब्रिवेट रँडोनुअर मॉडीएक्स (बीआरएम) 36 सायकलिस्टनी यशस्वीरित्या पूर्ण केली. ही राईड पूर्ण करण्यासाठी 20 तासांचा अवधी देण्यात आला होता.
याशिवाय 15 सायकलिस्टने ट्राय गोवाने आयोजित केलेली ब्रिवेट्स पॉप्युलर 150 किलोमीटरची राईड 10 तासांच्या वेळेत पूर्ण केली. फोंडा येथील 26 वर्षीय प्रकाश खत्रीने ही राईड 5 तास आणि 47 मिनिटांत पूर्ण केली. कामुर्ली येथील एडलीन मास्कारेन्हस या एकमेव महिलेने 300 किलोमीटरची तर साळगाव येथील मेगन फर्नांडिस आणि हळदोणेच्या मिचा फर्नांडिसने 150 किलोमीटरची राईड पूर्ण केली.
300 किलोमीटर बीआरएममध्ये सहभागी झालेल्या सायकलिस्टनी दोडामार्ग, मोले आणि पोळे या राज्याच्या सीमांवरून नंतर पश्चिम किनारपट्टीवरून ते दाबोळी विमानतळ, ओल्ड गोवा आणि शेवटी पणजी अशी राईड पहाटे 2 वाजेपर्यंत पूर्ण केली. वेळेत राईड पूर्ण करणाऱया सायकलिस्टना फ्रान्स येथील औडक्स क्लब पॅरीसतर्फे विशेष मंडल देण्यात येईल. आता ट्राय गोवाची 400 किलोमीटर बीआरइम ही राईड 19 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.