काळा आणि पांढरा हे एव्हरग्रीन रंग आहेत. मात्र काळे आणि पांढरे कपडे घालण्याचा किंवा कुर्त्यावर ब्लॅक, व्हाईट लेगिंग घालण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही बरीच वेगळी कॉम्बिनेशन्स करू शकता. सणासुदीच्या निमित्ताने काय करता येईल याविषयी…
* पार्टीला जाताना सीक्वेंस लूक कॅरी करता येईल. सीक्वेन्स हा प्रकारच अनोखा आणि स्टायलिश आहे. सीक्वेन्स वर्कवर फार काही करावं लागत नाही. डार्क किंवा लाईट रंगांचे सीक्वेन्स स्टाईल कपडे घालता येतील.
* मोनोक्रोमेटिक लूक हा सुद्धा चांगला पर्याय आहे. अगदी कॅज्युअल ऑकेजनपासून पार्टीपर्यंत कुठेही हा लूक कॅरी करता येईल. ऑफिसमध्ये हा लूक कॅरी करायचा असेल तर प्लेन कपडय़ांची निवड करता येईल. फिरायला जाणार असाल तर प्रिंटेड कपडय़ांची निवड करा.
* तुम्ही एकाच रंगाचा प्लेन ड्रेस घालू शकता. प्लेन ड्रेस साधा वाटत असला तरी यामुळे हटके लूक मिळतो. प्लेन लाँग ड्रेस किंवा शॉर्ट आउटफिट कॅरी करता येईल. इथे तुम्हाला रंगांमध्येही बरेच पर्याय आहेत. * तुम्ही मिक्स अँड मॅच किंवा काँट्रास्ट रंगांची निवड करू शकता. नेव्ही ब्लू आणि पिवळा, लाल आणि आकाशी असे रंगही छान दिसतात. डार्क नेव्ही ब्लू आणि पेस्टर ऑरेंज असं कॉम्बिनेशनही करता येईल. इथेही तुम्हाला बरेच पर्याय मिळतील.