एजकॉनेक्स -अदानी एंटरप्राईझेस करणार केंद्राची उभारणी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशामध्ये डाटा केंद्राची उभारणी करण्यासाठी अदानी एंटरप्राईझेस उपक्रम सुरु करणार आहे. या कार्यक्रमासाठी अमेरिकेतील कंपनी एजकॉनेक्ससोबत अदानी एंटरप्राईझेस संयुक्त उपक्रम बनविणार असून यासाठी दोघांमध्ये करार करण्यात आल्याची माहिती आहे.
अदानी एंटरप्राईझेसने यावेळी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार हा करार पूर्ण मालकी असणाऱया डीसी डेव्हलपमेंट, चेन्नई आणि एजकॉनेक्सची सहयोगी कंपनी एजकॉनेक्स युरोप यांच्यात असेल. संयुक्त उपक्रमाचे ध्येय निश्चित केले असल्याने आगामी एक दशकात एक जीडब्लू डाटा केंद्राची क्षमता असणारा उपक्र म विकसित करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
संयुक्त उपक्रमामध्ये अदानी कॉनेक्स जेव्ही भारतामध्ये हायपरस्केल डाटा केंद्राचे नेटवर्क तयार करण्यावर लक्ष देणार आहे. याचा प्रारंभ हा चेन्नई, नवी मुंबई, नोएडा, वेशाखापट्टणम आणि हैदराबाद या बाजारांच्या माध्यमातून होणार असल्याचे संकेत आहेत.
माहिती संकलनाची गरज
भारतामध्ये आता सबस्क्राईबर्सची संख्या पाहता जगाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. यामध्ये क्लाउड, कंटेंट, नेटवर्क, इंटरनेट ऑफ थिंग्स(आयओटी), 5जी एआय आणि अन्य उपक्रमांची गरज पूर्ण करण्यासाठी देशात माहिती केंद्राची आवश्यकता आहे. यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी स्पष्ट केले आहे.