साहित्य : 1 वाटी चणाडाळ, अर्धी वाटी उडीदडाळ, 1 वाटी कोबी खिसून, 1 हिरवी मिरची बारीक चिरून, 1 कांदा बारीक चिरून, 1 गाजर खिसून, 1 वाटी इन्सटंट ओट्स, 4 लसूण पाकळय़ा चिरून, 2 ते 3 कढीपत्ता पाने बारीक चिरून, 1 चमचा बडीशेप, चवीपुरते मीठ, 2 चमचे कोथिंबीर बारीक चिरून
कृती : चणाडाळ आणि उडीदडाळ अर्धा तास स्वतंत्ररित्या भिजत घालावी. नंतर निथळून त्यात थोडेसे मीठ घालून मिक्सरला लावून बाऊलमध्ये काढावी. नंतर त्यात कोबी, हिरवी मिरची, कांदा, गाजर, ओट्स, ठेचलेली लसूण, कढीपत्ता, बडीशेप, कोथिंबीर आणि आवश्यकतेनुसार मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. आता गॅसच्या मध्यम आचेवर आप्पे पात्र गरम करावे. त्यावर तेलाचे थेंब टाकून वडय़ाचे मिश्रण चमचाच्या सहाय्याने घालावे. त्यावर झाकण ठेवावे. नंतर चमचाच्या सहाय्याने अथवा सुरीच्या सहाय्याने वडा पलटून दोन्ही बाजूने खरपूस भाजावे. आता तयार डाळ मसाला वडा चहासोबत खाण्यास द्या.