गटारी स्वच्छ करण्याची मागणी : सांडपाणी साचून दुर्गंधी
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील हॉटेल, हॉस्पिटल, कारखाने यासह घरांतील सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारी व नाल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. गटारीतून सांडपाणी वाहते खरे. मात्र गटारींचे बांधकाम काही ठिकाणी अर्धवट असल्यामुळे हे सर्व सांडपाणी एकाच ठिकाणी साचून राहत आहे. ही परिस्थिती फोर्ट रोडवरील जिजामाता चौक येथील बसथांब्याच्या मागील बाजूस निदर्शनास येते.
येथील बसथांब्याच्या मागील बाजूस सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या गटारीची पुढील बाजू बंद करण्यात आल्यामुळे गटारीतील सर्व सांडपाणी एकाच बाजूला साचून राहिले आहे. परिणामी सांडपाण्यावर डासांचा फैलाव मोठय़ा प्रमाणात वाढला आहे.
या गटारीच्या बाजूच्या परिसरात शाळा-महाविद्यालये आहेत. काही विद्यार्थी येथील बसस्थानकावर बसची वाट पाहत असतात. त्यामुळे येथे डासांच्या प्रादुर्भावामुळे अनेक रोग उद्भवण्याची शक्मयता आहे.
गटारीत साचून राहिलेल्या कचऱयाची लवकर उचल करावी. जेणेकरून डासांचा प्रादुर्भाव कमी होईल. येथील गटारीचे सांडपाणी वाहून जाण्यास पुढील गटार लवकरात लवकर स्वच्छ करून वाट मोकळी करून द्यावी, अशी मागणी होत आहे.