बहुतेक भागात रात्री उशिरापर्यंत वीज गुल. पडझडीच्या किरकोळ घटना.
डिचोली/प्रतिनिधी
वेधशाळेने अंदाज वर्तविल्याप्रमाणे काल बुध. दि. 23 मार्च रोजी संध्याकाळी जोरदार पावसाने वाऱयासह हजेरी लावली. त्यामुळे लोकांची बरीच तारांबळ उडाली. विशेषतः दुचाकी चालकांची धांदल झाली. अचानक पावसामुळे बाजार काही काळासाठी ओस पडला होता. लोकांनी सुरक्षित स्थळी आसरा घेतला.
गेले दोन दिवस डिचोली तालुक्मयातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. तर ऊकाडा बऱयाच प्रमाणात वाढला होता. पाऊस पडण्याची शक्मयता होतीच. संध्याकाळी अचानक पावसाचे ढग दाटल्याने काळोख पसरला आणि विजेचा लखलखाट व गडगडाट तसेच जोरदार वाऱयासह पावसाने हजेरी लावली. तालुक्मयात सर्वच ठिकाणी एकाच वेळी पावसाची बरसात झाली. पण सर्वच ठिकाणी पावसाचा काळ एकच नव्हता. साखळी शहरात काही ठिकाणी पंधरा ते वीस मिनीटेच पाऊस पडला. तर ग्रामीण भागात बराच काळ पावसाची बरसात झाली.
डिचोली शहरी भागात सुमारे पाऊणतास जोरदार पाऊस पडला. तसेच जोरदार वाऱयामुळे लोकांनी घरा बाहेर किंवा रस्त्यावर येण्याचे धाडस केले नाही. त्यामुळे डिचोलीत आठवडा बाजार असूनही काही काळासाठी रस्त्यावर लोकांची वर्दळ नव्हती. तसेच साखळी बाजारातीलही रस्ते काही काळासाठी निर्मनुष्य बनले होते. जोरदार वारे आणि पावसामुळे काही ठिकाणी किरकोळ झाडांची पडझड झाली. मात्र मोठी नुकसानी झाली नाही. या पावसामुळे संध्याकाळी कामावरून सुटून घरी परतणाऱया कामगार वर्ग आणि इतरांची तारांबळ झाली. पावसामुळे काही प्रमाणात थंडावा निर्माण झाल्याने लोकांना असह्य उकाडय़ापासून काहीसा दिलासा मिळाला. पण वाऱयामुळे अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत वीज गुल होती. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विथ कर्मचाऱयांची शर्थीचे प्रयत्न सुरू होते.