जोरदार वाऱयामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड. अनेक रस्ते झाडांमुळे ठप्प. ग्रामीण भाग शनिवारी रात्रीपासून अंधारात

डिचोली/प्रतिनिधी
तौक्ते वादळाचा चांगलाच तडाखा राज्याला बसला असून डिचोली तालुक्मयाला पावसाने अक्षरशः झोडपून काढताना संपूर्ण जनजिवन विस्कळीत करून सोडले. जोरदार वारे आणि पावसाचा जोरदार मारा यामुळे डिचोली तालुक्मयात अनेक ठिकाणी घांवर, झाडांवर, वीजवाहिन्यांवर, वाहने, गोठे यावर झाडे पडल्याने लाखेंचे नुकसान झाले. शनिवारी रात्रीपासून पाऊस सुरू झाल्यानंतर डिचोली तालुक्मयातील अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडीत झाला होता तो काल रविवारी रात्रीपर्यंत सुरळीत झाला नव्हता. या आपत्कालीन घटनांमुळे डिचोली अग्निशामक दल व वीज खाते यांची दिवसरात्र बरीच दमछाक झाली होती.
या वादळामुळे गोवा राज्यात जोरदार वाऱयासह पावसाची शक्मयता देऊन सतर्कतेचा इशारा दिला होता. त्याचप्रमाणे शुक. दि. 14 मे रोजी रात्री वीजेच्या लखलखाट, घडघडाटासह जोरदार पाऊस झाला होता. तसेच शनिवारी रात्रीही वारे आणि पाऊस पडला होता. तर काल रविवारी पहाटेपासून जोरदार वाऱयासह सलग पावसाने हजेरी लावत संपूर्ण तालुक्मयातील जनजीवन विस्कळीत करून ठेवले. काल रविवार असल्याने तसेच राज्यात कर्फ्य? लागू असल्याने एरव्ही म्हणून संध्याकाळी सर्वत्र सामसूम असतेच. मात्र काल पावसाने जोरदार वृष्टी चालूच ठेवल्याने डिचोली साखळी शहरातील तसेच ग्रामीण भागातीलही सर्वच रस्ते जवळपास निर्मनुष्य बनले होते.
या वादळी वारे आणि पावसामुळे डिचोली तालुक्मयात अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. शहरातील तसेच ग्रामीण भागांमधील अनेक रस्त्यांवर झाडे पडल्याने बहुतेक रस्त्यांवरील वाहतूक ठप्पच झाली होती. तसेच या झाडांबरोबर वीज खांब आणि चालू विद्यूत वाहिन्या तुटल्याने ग्रामीण भागातील बहुतेक गाव शनिवारी रात्री ते रविवारी रात्रीपर्यंत अंधारातच होते. तर रविवारी रात्रभरही अनेक गावामधील खंडीत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी दिवसरात्र झटत होते. तसेच सर्वत्र पडलेली झाडे हटवून लोकांना तसेच वीज खात्याला दिलासा देण्यासाठी डिचोली अग्निशामक दालाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली दलाचे जवान दिवसरात्र तहान भूक विसरून राबत होते.
शिरगाव येथील प्रभाकर यांच्या घरावर झाड पडून 25 हजारांचे नुकसान झाले. मधलावाडा साळ येथे संदीप नाईक यांच्या घरावर झाडाची फांदी कोसळून त्यांचे 40 हजारांचे नुकसान झाले, गुरूकृपा कॉलनी हरवळे येथील संजय साखळकर यांच्या घरावर आंब्याच्या झाडाची फांदी पडून त्यांचे 25 हजारांचे नुकसान झाले. वेळगे येथील सुधीर कोरगावकर यांच्या घरावर झाडाची फांदी कोसळून त्यांचे नुकसान झाले. देऊळवाडा उसप लाटंबार्से येथील काशी काशिनथ गावकर यांच्या घरावर भेंडीच्या झाडाची फांदी पडून त्यांचे 10 हजारांचे नुकसान झाले. घाडीवाडा सुर्ल येथील चंद्रकांत पर्येकर यांच्या घरावर झाडाची फांदी पडून त्यांचे नुकसान झाले. गावकरवाडा मुळगाव येथील वैशाली परब यांच्या घरावर झाड पडून त्यांचे सुमारे 50 हजारांचे नुकसान झाले. वायंगिणी मये येथील भिवा गावकर यांच्या घरावर झाड पडून त्यांचे नचकसान झाले.
त्याचप्रमाणे मये, वायंगिणी, सुधा कॉलनी बोर्डे, साळ, सुर्ल, चोडण, शारदानगर मये, केरान चोडण, देवराई चोडण, सोनारपेठ डिचोली, शांतादुर्गा मंदिराजवळ पिळगाव, वाठादेव सर्वण, हरवळे, तिखाजन मये, हरीजनवाडा बोर्डे, सातेरी मंदिर बोर्डे, शाली बारजवळ नार्वे, एचडीएफसी बँकजवळ चोडण या ठिकाणी घरांवर झाडे पडल्याने नुकसान झाले. देऊळवाडा कुडणे व माडेल चोडण येथे दोन गेरेजींवर झाडे पडली. पिळगाव येथे एका झोपडीवर झाड कोसळले. तर संध्याकाळपर्यंत 21 ठिकाणी रस्त्यांवर झाडे पडल्याची नोंद अग्निशामक दलाकडे झाली होती. या सर्व ठिकाणी प्राधान्याने डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांनी उपस्थिती लावून झाडे हटविण्याची कामे केली होती. दिवसभर कोसळलेल्या जोरदार पावसामुळे डिचोली तालुक्मयातील सर्वच नाले, ओहळ भरून वाहत होते. अनेक ठिकाणी गटरांच्या व्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले दिसून आले. गटरातील पावसाळी पाण्याबरोबर मोठय़ा प्रमाणात माती आणि दगड, कचरा रस्त्यावर आल्याचे दिसून येत होते. डिचोली शहरात अनेक ठिकाणी सततच्या पावसामुळे पाणी साचले होते. पावसाचा मारा चालूच असल्याने पाणी रस्त्यावरून मोकळे होण्यास वेळ लागत होता. रविवार आणि त्यातच कर्फ्य? असल्याने रस्त्यांवर जास्त प्रमाणात गाडय़ांची वर्दळ नव्हती. तरीही नियमित कामानिमित्त रस्त्यावर फिरणाऱया गाडय़ांना पाण्यातून वाट काढावी लागत होती. डिचोली पुलाजवळ सेतू संगमजवळ सुरीचे झाड वीजखांबासह जुन्या पुलाच्या एका टोकाला पडल्याने पुलाचा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. सर्वण धावस्करवाडा येथे रस्त्यावर भलेमोठे झाड पडल्याने हा रस्ता पूर्णपणे वाहनांसाठी बंद झाला होता. डिचोली अग्निशामक दलाने सदर रस्ता झाड हटवून खुला केला.