रविंद्र गडादी नवे पोलीस उपायुक्त
प्रतिनिधी /बेळगाव
कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर रविंद्र गडादी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांच्या पाठोपाठ उपायुक्तांचीही बदली करण्यात आली आहे.
रविंद्र गडादी सध्या हुबळी येथील हेस्कॉम विभागाचे पोलीस प्रमुख म्हणून कार्यरत होते. यापूर्वी बेळगावचे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. आता पोलीस उपायुक्तपदी त्यांची वर्णी लागली आहे.
डॉ. विक्रम आमटे हे मूळचे बेळगाव जिल्हय़ातील मुनवळ्ळी येथील राहणारे आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी उत्तमरित्या सेवा बजावली आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात घडलेल्या अप्रिय घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकारने पोलीस आयुक्त व उपायुक्तांची बदली केली आहे.