फोंडा : चिखली येथे सुरु असलेल्या खुल्या नेव्ही विंडसर्फिंग अजिंक्यपद स्पर्धेत गोवा यॉटिंग संघटनेच्या डॅन कुएलो, किओना रजनी, आवेलीनो, पर्ल कोलवाळकर व आदर्श चुनेकर यांनी दुसऱया दिवशीही आपली आघाडी राखली आहे. डॅन कुएलोने दुसऱया दिवशी आरएस एक्स ऑलिंम्पिक गटात एका रेसमध्ये विजय व दोन रेसमध्ये द्वितीय स्थान मिळविले. आर्मी यॉटिंग नोड मुंबईच्या इबाद अलीने दोन रेसमध्ये विजय मिळवून दुसऱया स्थानी झेप घेतली आहे. किओना रजनीने आरएस ः 1 वूमन एशियन गेम्स गटात दुसऱया दिवशीही विजय प्राप्त केला. आवेलीनो फर्नांडिसने युथ ऑलिंम्पिक गटात तीनही रेस जिंकली. पर्ल कोलवाळकरने टेक्नो 293 मुलींच्या गटात प्रथम स्थान मिळविले. रेसबोर्ड युथ गटात आदर्श चुनेकरने आघाडी घेताना तीनही रेसमध्ये विजय मिळविला.
Previous Articleआय-लीगमध्ये चर्चिल-ट्राव लढत बरोबरीत; चेन्नईनचा विजय
Next Article गोवा – बंगाल रोमहर्षक लढत बरोबरीत
Related Posts
Add A Comment