कोरे गल्ली शहापूर वॉर्ड नंबर 20 मधील समस्या
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील विहिरींच्या पाण्यात डेनेजमिश्रित पाणी मिसळल्याने विहिरी दूषित होत चालल्या आहेत. डेनेजमिश्रित पाणी विहिरीत जात असल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. येथील कोरे गल्ली, शहापूर वॉर्ड नंबर 20 मध्ये गेल्या दहा दिवसांपूर्वी ही समस्या उद्भवली आहे.
शहराच्या विविध भागात डेनेजमिश्रित पाणी विहिरीत जात असल्याने विहिरींचे पाणी खराब होऊन नागरिकांना उलटी-जुलाब यासारख्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. येथील डेनेज ओव्हरफ्लो झाल्याने ही समस्या उद्भवली असून सर्व डेनेज सकिंग मशीनद्वारे स्वच्छ करावेत, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. येथील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी संबंधित अधिकाऱयांनी लक्ष देऊन तातडीने पावले उचलून सहकार्य करावे. अन्यथा, होणाऱया परिणामांना सामोरे जावे, असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.