प्रयागराज :
अलाहाबाद उच्च न्यायालयाने डॉ. कफील खान यांच्या त्वरित सुटकेचे आदेश मंगळवारी दिले आहेत. खान हे 6 महिन्यांपासून मथुराच्या तुरुंगात कैद होते. उच्च न्यायालयाने डॉ. खान यांच्या विरोधात लावण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा आदेशही रद्द केला आहे.न्यायालयाने याप्रकरणी 28 ऑगस्ट रोजी निर्णय राखून ठेवला होता. डॉ. कफील यांच्यावर नागरिकत्व सुधारणा कायदा तसेच एनआरसीवरून प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अलीगढच्या प्रशासनाने रासुकाची कारवाई केली होती. याच्या विरोधात कफील यांच्या आईने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. डॉ. कफील खान यांना 29 जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती.