प्रतिनिधी / कोल्हापूर
ड्रीम वर्ल्ड लगत असणाऱया कल्पतरू इमारतीची जागा शासकीय अथवा ओपन स्पेसमधील नाही. साजिद मुश्रीफ यांनी रितसर जागा मालकांकडून याचा वटमुख्त्यार घेतला आहे. कदम बंदूचे आरोप बिनबुडाचे आहेत. यासंदर्भात महापालिकेचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे पुराव्यांसह वस्तुस्थिती दाखवून दिली आहे. आठ दिवसांत जनतेसमोर सत्य परिस्थिती आणावी, अशी मागणीही त्यांच्याकडे केली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के. पोवार, माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लाटकर म्हणाले, रमणमळा येथील कल्पतरू इमारतीच्या जागेबाबत कदम बंधू यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांचे चिरंजिव साजिद मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे, कागदपत्रांची तपासणी न करता केले आहेत. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी या संदर्भात समिती नेमली असून अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करणार असल्याची म्हटले आहे.
वास्तविक शहाजीराजे छत्रपती यांनी 1959 मध्ये ही जागा घोरपडे घराणाला बक्षिसपत्र दिली होती. ही जागा अतिरिक्त क्षेत्र म्हणून 1973 मध्ये युएलसी कायदा अंतर्गत शासनाच्या ताब्यात गेली. यासंदर्भात घोरपडे यांनी तक्रार अर्ज दिला. 1998 मध्ये घोरपडे यांच्याबाजूने निकाल लागला. विशेष म्हणजे हसन मुश्रीफ यावेळी आमदार नव्हते. त्यामुळे सत्तेचा गैरवापर केला असे म्हणणे चुकीचे आहे. या जागेचा 2004 मध्ये घोरपडे यांनी साजिद मुश्रीफ यांच्या नावे वटमुख्त्यार दिला. 2005 मध्ये तळेगाव दाभाडे योजना मंजूर करून महापालिकेकडे रितसर अर्ज करून इमारत उभारली आहे. असे असताना कदम बंधू बुद्धीभेद करत असून प्रसिद्धीसाठी मोठÎा व्यक्तीच्या नावे बिनबुडाचा आरोप करत असल्याचे लाटकर यांनी सांगितले.
`तो’ प्लॅट ताराराणी आघाडीच्या नगरसेवकाचा
कल्पतरू इमारतीमध्ये एका नगरसेवकाचा प्लॅट असल्याचा आरोप कदम बंधूंनी केला होता. मात्र, ते नगरसेवक ताराराणी आघाडीचे आहेत. सत्यजित कदम यांचे वडील संचालक असणाऱया एका बँकेतून त्यांनी कर्ज घेऊन प्लॅट खरेदी केला आहे. बँक बेकायदेशीर बांधकामाला कर्ज देत असल्याचे लाटकर यांनी स्पष्ट केले.
मग ती 83 गुंठे जागा कोणाची?
ड्रीम वर्ल्ड शेजारील 53 आणि 30 गुंठे जागा कळीचा मुद्दा बनली आहे. कदम बंधूनी ही जागा मुश्रीफ बळकविण्याच्या तयारीत असल्याचा आरोप केला होता. मंत्री मुश्रीफ यांचे अभियंता किशोर सणगर यांनी या जागेवर महापालिकेनेच अतिक्रमण केला असल्याचा आरोप मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे ही जागा नेमकी कोणाची असा सवाल उपस्थित होत आहे.