बेळगाव : भारतातील सर्वात मोठा ज्वेलरी ब्रँड म्हणून नावाजल्या जाणाऱया ‘तनिष्क’ या टाटा समूहातील ब्रँडने बेळगावात नवे शानदार स्टोअर सुरू केले आहे. 2016 साली बेळगावात तनिष्कची सुरुवात झाली. गेल्या पाच-सहा वर्षांत ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला. हे लक्षात घेऊन ग्राहकांना अधिक प्रशस्त अशा जागेत चांगली सेवा देता यावी म्हणून या स्टोअरचे ‘कृष्णाई आर्केड’ (क्रोमा शोरुम समोर), खानापूर रोड, टिळकवाडी येथे स्थलांतर करण्यात आले असून या स्टोअरचे उद्घाटन कॅरेटलेन बोर्ड मेंबर (माजी एसव्हीपी ज्वेलरी डिव्हिजन, टायटन कंपनी लिमिटेड) संदीप कुलहळ्ळी यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी 11 वा. होत आहे.
नव्या स्टोअरच्या निमित्ताने तनिष्क ब्रँडतर्फे ग्राहकांना दागिन्यांच्या प्रत्येक खरेदीसोबत सोन्याच्या नाण्यांची मोफत भेट देण्यात येत आहे. 5 ते 7 एप्रिल 2022 दरम्यान या आकर्षक ऑफरचा लाभ घेता येईल.
तनिष्कचे हे स्टोअर तब्बल 5400 चौरस फुटांचे आहे. या स्टोअरमध्ये सोने आणि हिऱयांच्या तसेच नववधूसाठी खास तयार करण्यात आलेल्या दागिन्यांची विशाल श्रेणी उपलब्ध आहे. रिवाह बाय तनिष्कने पेश केलेली, लग्नात परिधान करण्याच्या दागिन्यांची शानदार श्रेणी देखील या ठिकाणी खरेदी करता येईल. याबरोबरीनेच तनिष्कचे फेस्टिव्ह कलेक्शन उत्साह, इतर एक्सक्मलुसिव्ह कलेक्शन्स मूड्स ऑफ अर्थ, लिटल बिग मोमेंट्स, एकत्वम, आरंभ देखील या नवीन स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत.
तनिष्कचा प्रत्येक दागिना अभिजात रचना सौंदर्य, अनुभूती व समृद्ध कलात्मकतेचा नमुना असतो.
तनिष्कमध्ये प्रत्येक व्यक्तीची आवडनिवड हमखास पूर्ण होते. ग्राहकांच्या आणि कर्मचाऱयांच्या सुरक्षेसाठी तनिष्कमध्ये गोल्ड स्टँडर्ड सुरक्षा नियमांचे पालन केले जाते. त्यामुळे या ठिकाणी ग्राहकांना सुरक्षित व सुविधाजनक खरेदीचा अत्युत्तम आनंद मिळवता येतो.
तनिष्क हा टाटा समूहातील ब्रँड भारतातील ग्राहकांचा सर्वाधिक पसंतीचा ब्रँड आहे. गेल्या दोन दशकांपासून हा ब्रँड उत्तमोत्तम कारागिरी, खास प्रेरणा व संकल्पना घेऊन बनवण्यात आलेला डिझाईन्स, उत्पादनांच्या गुणवत्तेची हमी यांचे प्रतीक मानला जात आहे. भारतीय महिलांची आवड, त्यांची स्वप्ने, इच्छा समजून घेऊन, परंपरा व आधुनिकता या दोन्हींशी संबंधित गरजा व इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने प्रयत्नशील असलेला एकमेव ज्वेलरी ब्रँड हा मान तनिष्कला मिळाला आहे. सध्या देशातील 220 पेक्षा जास्त शहरांमध्ये तनिष्कची 380 पेक्षा जास्त एक्सक्लुसिव्ह स्टोअर्स आहेत. या स्टोअरचे संचालक संतोष चांडक हे आहेत.