ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 2550 तबलिगी पदेशींना पुढील 10 वर्षांसाठी भारतात बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतचा निर्णय घेतला आहे.
या तबलिगींनी पर्यटनाच्या नावाखाली व्हिसा घेतला. त्यानंतर ते दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील मरकजमधील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमातून भारतात कोरोनाचा शिरकाव झाला. या नागरिकांवर दिल्ली पोलिसांनी आरोपपत्रेही दाखल केली आहेत.
या तबलिगींनी व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना यापूर्वी ब्लॅकलिस्ट करण्यात आले होते. यामध्ये बांग्लादेश, इंग्लंड, श्रीलंका, केनिया, जीबुती, टांझानिया, दक्षिण आफ्रिका, म्यानमार, थायलंड, नेपाळ, माली, नायझेरिया आणि ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांचा समावेश आहे.