वार्ताहर / विजापूर
विजापूर येथील तहसीलदार मोहनकुमार यांचा वाहनचालक आरीफ जुनेदी (वय 39) यांनी काल सायंकाळी येथील प्रवासी मंदिरात दोराने फास लावून घेऊन आत्महत्या केल्याची नेंद गांधी चौक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. घटनास्थळी तहसीलदार मोहनकुमारी, डीवायएसपी लक्ष्मी नारायणसह इतर अधिकाऱयांनी भेट देऊन पाहणी केली.