ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईतील ताडदेव परिसरात कमला या 20 मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 13 गाडय़ा दाखल असून, आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीत होरपळून 7 जणांचा मृत्यू झाला असून, 18 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्याच भाटिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही आग लेव्हल 3 ची असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ताडदेव परिसरातील गांधी रूग्णालयाच्या समोर असलेल्या कमला बिल्डिंगला आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही आग लागली. ही इमारत 20 मजली असून इमारतीच्या 18 व्या मजल्यावर आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 13 दाखल आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव इमारतीतील नागरिकांना बाहेर काढण्यात आले असून, आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. 18 जण जखमी झाले आहेत. त्यामधील 3 जण गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.