वार्ताहर /किणये
तालुक्यात श्रावण सोमवार भक्तिभावाने साजरा करण्यात आला. कोरोनाचे संकट असल्याने साध्या पद्धतीने साजरा केला. सकाळपासूनच शिवमंदिरामध्ये भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सामाजिक अंतर ठेवून भाविक दर्शन घेत होते.
तालुक्यात सिद्धेश्वर, कल्मेश्वर, रामेश्वर आदीसह ब्रम्हलिंग व ब्रम्हदेव अशी शिवस्वरुपाची गावा गावामध्ये मंदिरे आहेत. दुसऱया श्रावण सोमवारी मंदिरामध्ये गर्दी अधिक प्रमाणात दिसून आली. मंदिर ट्रस्टचे कार्यकर्ते भाविकांना सॅनिटायझर दोत होते. तसेच काही मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मोफत मास्कचे वाटपही करण्यात येत होते.
शिवमंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सोमवारी मंदिरामध्ये अभिषेक, महाआरती झाली, कणबर्गी येथील सिद्धेश्वर मंदिराच्या आवारात दर्शनासाठी भक्तांची रांग लागली होती.
मुचंडी येथील सिद्धेश्वर मंदिर, राकसकोप, बेनकनहळ्ळी, बेळगुंदी, बिजगर्णी, बहाद्दरवाडी, रणकुंडये, नावगे, मजगाव, मच्छे, पिरनवाडी, हिंडलगा, आंबेवाडी, मण्णूर, कडोली, अगसगे, निलजी, काकती, बस्तवाड, हलगा येथील मंदिरामध्ये जावून भक्तांनी आपल्या ग्राम देवतेचे दर्शन घेतले.
श्रावणातील सोमवारी भक्त मंडळी मोठय़ा प्रमाणात उपवास करतात. अनेक गावात सोमवारच्या दिवशी शेत शिवारातील कामे बंद ठेवून कडक वार पाळणूक केली जाते.
श्रावणातील दर सोमवारी काही मंदिरामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. यंदा मात्र कोरोनामुळे महाप्रसादाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दुसऱया श्रावण सोमवारनिमित्त मंदिरामध्ये भजन, प्रवचन, कीर्तन व जागर भजनाचे कार्यक्रम झाले.