प्रतिनिधी/ बांदा –
तिलारी प्रकल्पाच्या ओटवणे येथील प्रलंबित कामाबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा काम पूर्ण होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.त्याबाबत प्रशासनाला जाग येण्यासाठी बुधवारी 5 जानेवारी पाटबंधारे विभाग सावंतवाडी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे लेखी निवेदन इन्सुली ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर यांनी कार्यकारी अभियंता यांना दिले आहे