180 फूट लांबीच्या स्पॅनचे काम अंतिम टप्प्यात : जानेवारी अखेरपर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

प्रतिनिधी /बेळगाव
तिसऱया रेल्वे फाटकावर उभारण्यात येणाऱया उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू असून रेल्वेमार्गादरम्यान उभारण्यात येणाऱया स्पॅनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 180 फूट लांबीचा स्पॅन असल्याने बेळगाव शहरात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या लांब स्पॅनची उभारणी करण्यात येत आहे. सदर स्पॅन लवकरच बसविण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
शहरातील मध्यवर्ती भागामधून रेल्वेमार्ग असल्याने वाहतूक रहदारी असलेल्या फाटकांवर उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येत आहे. यापैकी तीन ठिकाणी पुलांची उभारणी झाली असून तिसऱया रेल्वे फाटकावर चौथा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. या पुलाच्या उभारणीचे काम कोरोनामुळे रखडले हेते. कोरोनामुळे उड्डाणपुलाचे काम करणारे कर्मचारी गावी गेल्याने काम बंद ठेवण्याची वेळ आली. तसेच दुसऱया लाटेमुळे कामबंद ठेवावे लागले. परिणामी सदर उड्डाणपुलाच्या उभारणीला विलंब झाला आहे. सध्या उड्डाणपुलाच्या उभारणीचे काम हाती घेण्यात आले असून पुलाच्या दोन्ही बाजूंनी रॅम्प बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच रेल्वेमार्गादरम्यान 180 फूट लांबीचे स्पॅन उभारणात आले आहे. इतक्मया लांबीचा स्पॅन बेळगावमधील कोणत्याच ठिकाणी बसविण्यात आला नाही. गोगटे चौकाजवळील पुलावर 120 फुटाचा स्पॅन बसविण्यात आला आहे. तिसऱया रेल्वे फाटकावर रेल्वेमार्गादरम्यान 180 फूट लांबीचा स्पॅन बसविण्यात येणार आहे. सदर स्पॅन तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून अर्धचंद्र आकाराची भव्य अशी पेम तयार करण्यात आली आहे. लवकरच ही प्रेम बसविण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
रॅम्प बनविण्यासह पुलावर फुटपाथ निर्माण करणे, सुरक्षा भिंतीचे बांधकाम करणे अशी विविध कामे करण्यात येत असून जानेवारी अखेरपर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.