बुधवार दि.20 ते मंगळवार दि.26 जानेवारी 2021
उत्कर्षाच्या महत्त्वाच्या सात सोनेरी पायऱया
अनेक जण हुशार असतात पण स्वतःची प्रगती कशी करून घ्यावी हे त्यांना माहीत नसते. त्यासाठी ‘कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती, कर मुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम्’ असा एक श्लोक आहे. तुमच्या हातात लक्ष्मी, सरस्वती आणि देव वास करतात हे लक्षात ठेवून माणसाने जीवन जगण्याचा प्रयत्न केल्यास त्याला लक्ष्मी, सरस्वती व देव प्रसन्न होईल. आपला उत्कर्ष कसा घडवायचा त्यासाठी सात महत्त्वाच्या पायऱया. वामनराव पै यांनी ‘तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात’ या पुस्तकात सांगितलेल्या आहेत. कष्ट, कर्तव्य, कौशल्य, कल्पकता, कौतुक, करुणा आणि कृतज्ञता या बाबींचा अवलंब केल्यास निश्चितच तुमची प्रगती होईल. रिकामपण व रिकामटेकडा माणूस या दोन गोष्टी महाभयंकर आहेत. रिकामटेकडा माणूस केव्हा काय करील हे ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकणार नाही. सतत काम करणाऱया माणसाला व्यसन करण्यास वेळ नसतो तर काहीच काम करण्याची इच्छा नसलेले लोक व्यसन व दुर्जन लोकांच्या आहारी जातात. त्यामुळे अशा लोकांची प्रगती होत नाही. ‘उद्योगाचे घरी लक्ष्मी वास करी’ या म्हणीनुसार उद्योग हा सर्वात मोठा योग आहे. नोकरी, धंदा, व्यवसाय असा कुठलाही उद्योग केल्यास माणसाला आज ना उद्या यश मिळतेच. देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे, म्हणूनच प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रे÷ होय. नुसते कष्ट केल्याने यश मिळत नसते तर योग्य दिशेने व अधिकारी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली योग्य प्रयत्न केल्यास माणसाला यशाचे शिखर नक्कीच गाठता येते. सामान्य माणसे विनासायास इच्छित ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी शॉर्टकटचे त्वरित फळ देणारे उपाय शोधत असतात. अशा लोकांची शेवटी फसगत व अधोगती होते. खूप पैसा, संपत्ती व यश प्राप्त करण्यासाठी अनिष्ट प्रवृत्तींचा आधार घेतला जातो. फास्ट फूड जसे आरोग्याला घातक तसेच फास्ट रिजल्ट सुद्धा जीवनाला घातक असतात. अनिष्ट व भ्रष्ट मार्गाने मिळवलेला शापित पैसा त्याला तरी बाधक ठरतोच, पण त्याच्या बायकामुलांना व त्याच्या पुढील पिढय़ानाही निसर्ग नियमाप्रमाणे व वारसा हक्का नुसार बाधक व विघातक ठरतो. ‘तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात’ हे पुस्तक प्रत्येकाने जरूर वाचावे. त्यातील विचारांचा अवलंब केल्यास तुमचे जीवन नक्कीच सुधारेल आणि आपले काय चुकते हे देखील समजेल. या पुस्तकातील प्रत्येक शब्द न शब्द अत्यंत मोलाचा आहे.
मेष
उत्साहवर्धक आठवडा. काही रेंगाळलेली कामे या आठवडय़ात पूर्ण होतील. गुंतागुंतीची कामे हातावेगळी करा. व्यवसाय, नोकरी व विद्यार्थी वर्ग यांनी अवांतर बाबीकडे लक्ष देऊ नये. जोडीदाराच्या आरोग्याची चिंता राहील. रवि-शनि युती असल्यामुळे सरकारी नोकरदार व राजकारणातील पुढाऱयांनी सावध राहावे. बदली किंवा तत्सम योगाला सामोरे जावे लागेल. विवाहेच्छूक तरुणांचे विवाह जमतील. कितीही गंभीर प्रसंग असला तरी नोकरी-व्यवसायात कोणाचे मन दुखवू नका. एखाद्यावेळेस कळतनकळत मोठी चूक होईल.
वृषभ
सर्व काही चांगले असूनही विनाकारण चिंता करणे हा काही लोकाचा स्वभाव असतो. त्यामुळे स्वतःला व दुसऱयांनाही त्रास होऊ शकतो, हे लक्षात ठेवून परिस्थितीनुसार वागा. नोकरी-व्यवसायात बदली किंवा बढती अचानक रद्द होण्याची शक्मयता आहे. जागेच्या प्रयत्नात असाल तर या आठवडय़ात चांगले योग आहेत. नेहमीच्या खर्चात वाढ होईल. कुटुंबातील कुणालातरी आजारपण येण्याची शक्मयता दिसते. घाईगडबडीत अथवा स्वतःच्या मनाने कोणतेही औषध अथवा इंजेक्शन घेऊ नका. रिकामी असाल तर नोकरीपेक्षा स्वतंत्र व्यवसायाकडे वळा.
मिथुन
आर्थिकदृष्टय़ा महिना उत्तम जाईल. नोकरी-व्यवसायात काही चमत्कारी बदल. राहत्या जागेसंदर्भातील प्रश्न मिटतील. कौटुंबिक जीवनात काही महत्त्वाच्या घडामोडी. त्यामुळे काही व्यवहारिक समीकरणे बदलावी लागतील. राहूचे भ्रमण शुभ नसल्याने सर्व बाबतीत सावध रहा. कुणावरही अति विश्वास टाकू नका. महत्त्वाच्या वस्तू गहाळ होणे, चोरीस जाणे असा धोका आहे. धनसंचय करण्याकडे लक्ष द्या. जमिनीचे प्लॉट विकण्याच्या विचारात असाल तर सध्या ग्रहमान उत्तम आहे.
कर्क
मोठय़ा जागेत जाण्याचे योग नोकरी करणाऱयांना अनुकूल बदल जाणवतील काही जणांचे विवाह अचानक जुळण्याची शक्मयता. विवाहित असाल तर सासू-सासरे यांच्या आरोग्याची काळजी घ्या. राजकारणात असलेल्याना रवि-शनिचे अशुभ परिणाम भोगावे लागतील. प्रकृती जपा. वडीलधाऱयांशी मतभेद होऊ शकतात. तंत्रज्ञ, मेकॅनिकल लाईन वगैरेशी संबंध असणाऱयांनी जपून रहावे. विद्यार्थ्यांनी आळशीपणा न करता अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे. काही काळाने शैक्षणिक क्षेत्रात नवीन नियम अचानक लागू होतील.
सिंह
रवि-शनि योगाचा परिणाम कंबरदुखी आणि गळय़ावर होऊ शकेल. आरोग्याची काळजी घ्या. दशमातील राहुमुळे तुमचा पराक्रम वाढेल. संकटातही ईर्षेने सर्व कामे पूर्ण कराल. काहीजणांचा नावलौकिक होईल. कोर्टकचेऱया, खटले या दिवशी नोकरदारांना प्रमोशनची संधी मिळेल. आणि मित्रमंडळी यांचे उत्तम सहकार्य मिळणार आहे. काही दुर्घटना होईल. जीवनाच्या वाटचालीस नवी दिशा मिळेल.
कन्या
धडपड व उत्साह योग्यवेळी मोठा फायदा करून देईल. स्वतंत्र व्यवसायात मोठे यश. डावा खांदा व उजवा डोळा याची काळजी घ्या. एखादी चांगली घटना घडून कुटुंबात आनंद राहील. व्यवसाय, नोकरी, विद्यार्थ्यास उत्तम काळ. काहीजणांना दूरचे प्रवासयोग. विवाहसाठी प्रयत्न चालू असतील तर निश्चित यश मिळेल. विशेष डामडौल न करता साधेपणाने विवाहकार्य केल्यास पुढे फायदा होईल. घरातील वडीलधाऱयांनी काही बाबतीत मुलांचेही ऐकणे योग्य ठरेल. त्यांच्यावर काही नवीन जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न करा.
तूळ
प्रवास, धार्मिक व मंगलकार्यात भाग घेणे, नोकरीसाठी मुलाखती याबाबतीत अनुकूल काळ आहे. वास्तू आणि वाहन घेण्याच्या विचारात असाल तर शंभर टक्के यश मिळेल. त्यादृष्टीने जरूर प्रयत्न करा. व्यवसाय नोकरीत काहीजणांच्या हस्तक्षेपामुळे किरकोळ त्रास संभवतात. वडील आणि मुले यांच्याबाबतीत काही नव्या चिंता निर्माण होतील. त्यामुळे महत्त्वाची कामे काही दिवस स्थगित ठेवावी लागतील. तंटेबखेडे, वाद-विवाद, गैरसमज यांना अजिबात वाव देऊ नका.
वृश्चिक
विद्यार्थ्यांना शिक्षणात उत्तम यश मिळेल. विवाहइच्छुकांना मनाजोगी चांगली स्थळे मिळण्याचे योग. नोकरी, व्यवसायात थोडीशी तडजोड करावी लागेल. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना बऱयाच अडचणींना तोंड द्यावे लागेल. काहीजणांना सत्तेवर पाणी सोडण्याचा प्रसंग येईल. तरुणवर्गाने वाहनवेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक. सरकारी नोकर आणि इतर कर्मचाऱयांनी कामाकडे लक्ष द्यावे. झटपट मार्गाने पैसा मिळेल या भ्रमात राहू नका.
धनु
काही महत्त्वाची कामे हाती घेऊन ते पूर्ण कराल. रवि-शनि युती, वादावादी, मतभेद यामुळे नोकरीत धोका निर्माण करील. उच्चपदावर असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी. कौटुंबिक जीवनात महत्त्वाची अनपेक्षित घटना. कुटुंबातील महत्त्वाची माहिती अथवा आर्थिक कमाईचे मार्ग इतरांना समजू देऊ नका. रवि -शनिचा योग चांगला नसल्यामुळे कुठेही महत्त्वाची गुंतवणूक करताना सावध रहा. फसवणूक अथवा संस्था डबघाईला येणे असे प्रकार अनुभवाला येतील. बँकेशी आर्थिक व्यवहारात गुंतला असाल तर व्यवहार नीट राहतील याची काळजी घ्या.
मकर
एखादी लोकविलक्षण कामगिरी करण्याचा विचार कराल. एखाद्या मोठय़ा संकटातून पार पडाल, पण कळतनकळत गुंतलेल्या पूर्वीच्या काही प्रकरणांमुळे मानसिक त्रास होईल. बुद्धिचातुर्य व व्यवहारकौशल्य यांची या आठवडय़ात अग्निपरीक्षा होईल. प्रयत्न करूनही त्याप्रमाणे यश मिळेलच असे नाही. शंख्याशास्त्र, गणित, गायन-वादन, रमलशास्त्र यात यश मिळवाल. एखादा नवीन व्यवसाय सुरू होण्याची शक्मयता आहे पण, आरोग्य व कौटुंबिक बाबी याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
कुंभ
या आठवडय़ात काही अनपेक्षित लाभाच्या संधी येतील. नोकरी, व्यवसाय कमिशन एजन्सी अथवा पूर्वीचा गुंतवणुकीचा आर्थिक फायदा मिळेल. राजकारणातील व्यक्तीनी सर्व बाबतीत सांभाळून राहणे आवश्यक. नोकरी व्यवसायात कुणाचेही मन न दुखवता सांभाळून घेऊन जावे लागेल. कौटुंबिक जीवनात सर्वांचे विचार ऐकून मगच महत्त्वाचे निर्णय घ्या. एखादी किरकोळ चूक देखील तुमच्या प्रयत्नांवर पाणी फिरवू शकते. साडेसातीची प्रखरता वाढत आहे, त्यामुळे जुनी कामे लवकरात लवकर हातावेगळी करण्याचा प्रयत्न करा.
मीन
आजारपण आणि गृहकलह यामुळे महत्त्वाची कामे रखडतील. त्यामुळे चिडचिड होण्याची शक्मयता. खर्चावर नियंत्रण ठेवा. कितीही गंभीर समस्या उद्भवली तरी त्यातून निश्चित मार्ग निघेल. घाईगडबड, अतिलोभ, अतिवेग यापासून दूर राहावे लागेल. नोकरी-व्यवसायात कुणाची चूक दिसून आली तरी सांगण्याचा प्रयत्न करू नका. प्रलोभन, लाचलुचपत, भ्रष्टाचार इत्यादी मार्गाने अचानक धनलाभाचे योग येतील पण त्यापासून दूर राहा. निष्कारण कुणीतरी मुद्दाम परीक्षा पाहण्याची शक्मयता आहे.