सुडुगाडूसिद्द समाजाचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
घटप्रभा येथील एका कुटुंबाच्या विरोधात अपप्रचार करून त्यांच्यावर बहिष्कार घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो निषेधार्थ आहे. या कुटुंबाला नाहक त्रास देण्यासाठी काही जणांनी हा कुटिल डाव रचला असून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कर्नाटक राज्य सुडुगाडूसिद्द महासंघाच्यावतीने करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे. घटप्रभा येथील सोनव्वा रामाप्पा घटण्यावर, संतासिनी आणि कोंड्री या कुटुंबांच्या विरोधात अपप्राचार सुरू करण्यात आला आहे.
बेळगाव जिल्हय़ामध्ये जवळपास सुडुगाडूसिद्द समाजाची 1 हजारांहून अधिक कुटुंबे आहेत. त्यामधील या कुटुंबाला जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तेंव्हा संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सुडुगाडूसिद्द समाजाने केली आहे. यावेळी समाजातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.