प्रतिनिधी / वारणानगर
कोरोना बाधीत रूग्णाने गावचे नाव चुकीचे सांगीतल्याने पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे आज शनिवार दि. ११ रोजी सकाळी एकच खळबळ उडाली तपासणी अंती हा रुग्ण तळसंदे ता. हातकंणगले येथील असल्याचे स्पष्ट झाल्यावर सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.
वारणानगर ता.पन्हाळा येथील श्री.ता.को. वारणा सह. साखर कारखान्यात चालक म्हणून नोकरीस असलेला परंतु लॉकडाऊन सुरू झाले पासून कामावर नसलेला कर्मचारी नांदेड येथे कामानिमीत्त गेला होता त्याने परतत असताना तपासणी नाक्यावर नाव सांगत गावाचे नांव चुकीचे कोडोली असे सांगीतले त्यामुळे त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पन्हाळा येथील कोव्हीड केंद्रावर पाठवले होते त्याचा कोरोना बाधीत असल्याचा अहवाल पॉझीटिव्ह आल्याने कोडोलीत आज एकच खळबळ उडाली. कोडोलीत कोण सापडले तो कोणत्या भागातील आहे याची विचारपूस करण्यासाठी ग्रामपंचायत, सरकारी दवाखाना येथे लोक संपर्क करू लागले होते त्यामुळे सर्वानाच कोडोलीत रूग्ण सापडला याची धास्ती लागून राहिली होती.
कोडोलीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती मिळताच ग्रामपंचायतीची कोरोना दक्षता समितीची चांगलीच धावपळ उडाली अशा नावाची व्यक्ती कोडोलीत नसल्याने त्यांच्या पुढे मोठा प्रश्न उभा राहिला होता ही माहिती वाऱ्यासारखी सोशल मीडियावर गावात पसरताच नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले व गावात शांतता निर्माण झाली. परंतु ग्रामपंचायतीच्या वतीने सखोल चौकशी केली असता सदर व्यक्ती कोडोलीतील नसून तळसंदे ता.हातकलंगले येथील असल्याचे सिद्ध झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला परंतु ही चूक झालीच कशी असा प्रश्न नागरिक करू लागले आसून तपासणी नाक्यावर अधारकार्ड पाहूनच पत्ता नोंदवावा अशी मागणी या निमीत्ताने होऊ लागली आहे.
ग्रामस्थांनी अफवावर विश्वास ठेवू नये : सरपंच शंकर पाटील
कोरोना बाधीत व्यक्ती हा तळसंदे ता.हातकलंगले गावचा असून वारणा कारखान्याचा कर्मचारी आहे. तो लॉक डाऊन सुरू असल्या पासून कामावरही आलेला नाही त्यामुळे कोडोलीला या व्यक्ती पासून कोणताही धोका नाही कोणीही घाबरू नये सदर रुग्णाने चुकीचा दिलेला पत्ता बदलनेसाठी शासकीय यंत्रनेस संपर्क केला आहे अफवावर विश्वास ठेवू नये असे सरपंच शंकर पाटील यानी सांगीतले.
Previous Articleधक्कादायक : कोंढव्यात सराईत गुन्हेगाराचा घरात घुसून खून
Next Article WHO कडून मुंबईतील धारावी मॉडेलचे कौतुक
Related Posts
Add A Comment