प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे भगवतीनगर येथे राम रोड येथील एका विहिरीत बिबट्या पडला होता. त्याला वनविभागाने सुरक्षितरित्या बाहेर काढून पिंजऱ्यात बंदिस्त केले.
राम रोड येथे बापट यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचे लक्षात आल्यावर वन विभागाला यासंबंधीची माहिती देण्यात आली. वनविभागाचे पथक घटनास्थळी आले. त्यांनी दोऱ्या व अन्य साधनांच्या साह्याने बिबट्याला विहिरीतून सुरक्षितरित्या बाहेर काढले व पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात आले. त्याला आता नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
Previous Articleमहाराष्ट्रात मागील 24 तासात 98 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह
Next Article घराबाहेर पडू नका, वीजा चमकताना झाडाखाली उभे राहू नका
Related Posts
Add A Comment