ऑनलाईन टीम / बँकॉक :
थायलंडच्या राजाची बदनामी करणाऱ्या 10 लाख नागरिकांची फेसबुक अकाऊंट थायलंड सरकारने ब्लॉक केली आहेत. थायलंड सरकारच्या कारवाईविरोधात फेसबुक आता कायदेशीर लढा देण्याच्या तयारीत आहे.
थायलंडमध्ये रॉयलिस्ट मार्केट ग्रुप नावाने ओळखल्या जाणाऱ्या गटाने तेथील राजाची फेसबुकवर बदनामी केली. या गटाने राजाच्या बदनामीचा मजकूर सोशल नेटवर्किंगवरुन हटवण्यास नकार दिला. त्यामुळे थायलंड सरकाने या गटाशी संबंधित 10 लाख लोकांचे फेसबुक अकाऊंट ब्लॉक केले.
थायलंड सरकारच्या या करवाईविरोधात फेसबुक आक्रमक झाले आहे. अशा प्रकारची कारवाई म्हणजे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार आहे, अशी टीका फेसबुकने थायलंड सरकारवर केली आहे. तसेच लवकरच फेसबुक यासंदर्भात कायदेशीर लढा देईल, असे फेसबुकच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.