शिखरांवर राहणाऱया जवानांसाठी तंबूची निर्मिती, उणे 15 अंश तापमानात तंबूत 15 अंश तापमान राहणार
लडाखच्या गलवान खोऱयातून काही चांगली छायाचित्रे समोर आली आहेत. तेथे समाजसेवक सोनम वांगचुक यांनी सैनिकांसाठी नेहमी 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमान राहिल अशाप्रकारचा तंबू निर्माण केला आहे. बाहेर उणे 20 अंश सेल्सिअसची कडाक्याची थंडी असेल तरीही तंबूतील तापमान कायम राहणार आहे.

सोनम वांगचुक यांच्यावरच सुपरहिट चित्रपट थ्री इडियट्स तयार करण्यात आला होता. या चित्रपटात आमिर खान यांनी सोनम वांगचुक यांची व्यक्तिरेखा साकारली होती. यात आमिरचे नाव रँचो होते.
लडाखमध्ये 24 तास वीज राहणे अवघड आहे. याचमुळे तेथे तैनात सैनिक थंडी दूर करण्यासाठी डिझेल, केरोसिनद्वारे लाकुड पेटवतात. पण हे त्यांच्यासाठी अत्यंत हानिकारक ठरते. तर नव्या तंबूत हिटर लावण्यात आला आहे. हा हिटर सौरऊर्जेने संचालित होतो. एका तंबूत 10 सैनिक राहू शकतात, याचे वजन 30 किलोपेक्षाही कमी असल्याची माहिती वांगचुक यांनी दिली आहे.