वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
येथे सुरू असलेल्या दुसऱया क्रिकेट कसोटीतील रविवारी खेळाच्या तिसऱया दिवसा अखेर दक्षिण आफ्रिकेने यजमान न्यूझीलंडवर 211 धावांची आघाडी मिळविली आहे.
या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 364 धावा जमजविल्यानंतर न्यूझीलंडचा पहिला डाव 293 धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात न्यूझीलंडवर 71 धावांची आघाडी मिळविली. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात ग्रॅण्डहोमने नाबाद शतक झळकविले. त्याने 158 चेंडूत 3 षटकार आणि 12 चौकारांसह 120 तर मिचेलने 8 चौकारांसह 60, निकोल्सने 8 चौकारांसह 39, वेग्नरने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 21 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे रेबाडाने 60 धावांत 5 तर जेनसेनने 98 धावांत 4 आणि केशव महाराजने 46 धावांत 1 गडी बाद केला.
71 धावांची आघाडी मिळविलेल्या दक्षिण आफ्रिकेने दिवसअखेर दुसऱया डावात 53 षटकांत 5 बाद 140 धावांच जमविल्या. व्हॅन डेर डय़ुसेनने 5 चौकारांसह 45, मार्करेमने 3 चौकारांसह 13, कर्णधार एल्गारने 2 चौकारांसह 13, बेहुमाने 2 चौकारांसह 23 केल्या. व्हेरेनी 2 चौकारांसह 22 तर मुल्डेर 10 धावांवर खेळत आहे. न्यूझीलंडतर्फे साऊदी आणि वेग्नर यांनी प्रत्येकी 2 तर हेन्रीने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका प. डाव सर्वबाद 364, न्यूझीलंड प.डाव सर्वबाद 293 (ग्रॅण्डहोम नाबाद 120, मिचेल 60, निकोल्स 39, वेग्नर 21, रेबाडा 5-60, जेनसेन 4-98, केशव महाराज 1-46), दक्षिण आफ्रिका दु. डाव -53 षटकांत 5 बाद 140 (व्हॅन डेर डय़ुसेन 45, बेहुमा 23, व्हेरेनी खेळत आहे. 22, एल्गार 13, मार्करेम 14, साऊदी 2-28, वेग्नर 2-44, हेन्री 1-25).