चित्रीकरणाला प्रारंभ : 23 ऑक्टोबरपासून मालिका प्रेक्षकांच्या भेटीला
निर्मार्ता, दिग्दर्शक महेश कोठारे यांची माहिती
प्रतिनिधी / कोल्हापूर
‘दख्खनचा राजा जोतिबा, या मालिकेच्या चित्रीकरणाला रविवारपासून शुभारंभ झाला आहे. 23 ऑक्टोबर सायंकाळी 6.30 वाजता `स्टार प्रवाह’ वाहिनीवर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सरकारच्या नियमांचे पालन करीत प्रत्येक कलाकार तंत्रज्ञांचा विमा उतरवला आहे. या मालिकेत जास्तीत जास्त स्थानिक कलाकार घेतले आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या स्थानिक कलाकारांना रोजगार मिळेलच, त्याबरोबर माझी कर्मभूमी असलेल्या चित्रनगरीला गतवैभव प्राप्त होईल, अशी माहिती निर्माता, दिग्दर्शक महेश कोठारे यांनी आयोजित ऑनलाईन पत्रकार परिषदेत होती.

‘दख्खनचा राजा जोतिबा’ या मालिकेसाठी पाच वर्षापासून संशोधन सुरू होते. मराठी माणसाचे दैवत असलेल्या जोतिबाची मालिका तयार करत असताना अंबाबाई, चोपडाई, मसाई, शंकर, पार्वती, विष्णू महिषासूर वध यासह कोल्हापूरची वैशिष्टेही या मालिकेतून दाखवण्यात आली आहेत. या सेटवर एक गाव, महाल आणि आश्रम तयार करण्यात आला आहे. मालिकेचे संपूर्ण शुटींग या सेटवर होणार आहे. या चित्रपटात अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री निता परूळकर हे मुख्य भूमिकेत दिसतील. स्टार प्रवाहाचे सतीश राजवाडे म्हणाले, महेश कोठारे यांनी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘दख्खनचा राजा जोतिबा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. दिवेलागणीच्या वेळेला महाराष्ट्राच्या दैवताचे दर्शन लोकांना द्यायला स्टार प्रवाह परिवाराला आवडेल. मालिकेच्या चित्रीकरणासाठी कोल्हापुरात अनेक उत्तम शुटींग स्पॉट आहेत. कोल्हाप्tढरच्या लोकांमध्ये उपजतच कला आहे. चित्रनगरीचे संचालक संजय पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या चित्रनगरीला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी भरपूर प्रयत्न केले. या मालिकेच्या चित्रीकरणानंतर अन्य मालिका व चित्रपट कोल्हापुरात येतील. स्थानिक कलाकारांना रोजगार मिळेल, अशी अपेक्षा आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, `दख्खनचा राजा जोतिबा’ ही मालिका राज्यभरातील लोकांना एक पर्वणीच आहे. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी लागेल ते सहकार्य देवस्थान समिती करणार आहे. अभ्यासक, संशोधक विठ्ठल ठोंबरे म्हणाले, `दख्खनचा राजा जोतिबा’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या लोकदैवताचा महिमा पाहायला मिळणार आहे. अभ्यासपूर्ण लिहिलेले कथानक असून, त्याची निर्मिती व दिग्दर्शन इतर पौराणिक मालिकांना मागे टाकणारे आसेल.
‘दख्खनचा राजा जोतिबा, मालिकेत अंबाबाईच
दख्खनचा राजा जोतिबा, अंबाबाई म्हटलं की राज्यभरातील भाविकांची श्रध्दा जागी होते. प्रत्येकजण भक्तिभावाने हात जोडतो. त्यामुळे या मालिकेत अंबाबाई हेच नाव राहणार आहे.