प्रतिनिधी / कुपवाड
पूर्ववैमनस्यातून खुन्नस ठेवून शुक्रवारी कुपवाडमधील राष्ट्रवादीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय महादेव पाटोळे यांचा हल्लेखोरांनी संगनमत करून धारदार शस्त्राद्वारे पाठलाग करून खून केला होता. याप्रकरणी अटक केलेल्या पाच संशयितांना न्यायाल्याने २० जुलैपर्यंत नऊ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश सुनावला.
दरम्यान, सखोल चौकशीसाठी आणखी काही संशयितांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. शनिवारी अटक केलेल्यांमध्ये मुख्य सूत्रधार निलेश विठोबा गडदे (२१, रा. वाघमोडेनगर), सचिन अज्ञान चव्हाण (२२, रा.आर.पी.पाटील शाळेजवळ), वैभव विष्णू शेजाळ (२१, रा.विठुरायाचीवाडी, कवठेमहांकाळ, सध्या रा. वाघमोडेनगर), मृत्यूंजय नारायण पाटोळे ( २७, रा.आंबाचौक ) व किरण शंकर लोखंडे (१९,रा.वाघमोड़ेनगर) यांचा समावेश आहे. यात मास्टरमाइंड कोण? त्यांनी खुनाचा कट कसा रचला? हत्त्यारे व वाहने कुठे लपवली ? आणखी किती जनांचा समावेश आहे ? याबाबत पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास कुपवाड एमआयडीसीतील रोहीणी कोल्ड स्टोअरेजमध्ये हल्लेखोरांनी थरारक पाठलाग करून पाटोळेचा खून केला होता. याप्रकरणी सांगली एलसीबीच्या पथकाने वरील पाच संशयितांना अटक करून खूनाचा छडा लावला. मयत दत्ता पाटोळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व एमआयडीसीतील कारखान्यात कामगार पुरवठा करणारे कन्त्राटदार होते. शुक्रवारी दुपारी पाटोळे कामगारांचा पगार भागवून घरी जात असताना त्यांच्यावर संशयित पाचजणांनी गाडी आडवी मारून धारदार शस्त्राने हल्ला चढवून खून केला. हा खून किरकोळ कारणावरुन पूर्वीच्या वादातुन झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, या प्रकरणात सध्या पाचजणांना अटक केली असली तरी पडद्यामागे आणखी काही सूत्रधार लपल्याचा आरोप पाटोळे यांचे नातेवाईक व समर्थकांनी केला आहे.
त्यांचा शोध घेऊन अटक करा, अशी मागणी पाटोळेच्या नातेवाईकांनी रविवारी मोर्चाद्वारे केली. त्यामुळे यात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. अधिक तपास सपोनि नीरज उबाळे करीत आहेत.ळेचा खून केला होता. याप्रकरणी सांगली एलसीबीच्या पथकाने वरील पाच संशयितांना अटक करून खूनाचा छडा लावला. मयत दत्ता पाटोळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व एमआयडीसीतील कारखान्यात कामगार पुरवठा करणारे कन्त्राटदार होते. शुक्रवारी दुपारी पाटोळे कामगारांचा पगार भागवून घरी जात असताना त्यांच्यावर संशयित पाचजणांनी गाडी आडवी मारून धारदार शस्त्राने हल्ला चढवून खून केला.
हा खून किरकोळ कारणावरुन पूर्वीच्या वादातुन झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, या प्रकरणात सध्या पाचजणांना अटक केली असली तरी पडद्यामागे आणखी काही सूत्रधार लपल्याचा आरोप पाटोळे यांचे नातेवाईक व समर्थकांनी केला आहे. त्यांचा शोध घेऊन अटक करा, अशी मागणी पाटोळेच्या नातेवाईकांनी रविवारी मोर्चाद्वारे केली. त्यामुळे यात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. अधिक तपास सपोनि नीरज उबाळे करीत आहेत.
Previous Articleसोलापूर ग्रामीणमध्ये आज ३३ कोरोनाबाधितांची भर
Next Article दत्ता पाटोळे खून प्रकरणाची सीबीआय चौकशी करा
Related Posts
Add A Comment