स्वतःच पेटवायची लायटर : माणसांमुळे झाली चेन स्मोकर
धूम्रपानामुळे शरीराला अनेक प्रकारे नुकसान होत असल्याने आरोग्यतज्ञ धूम्रपान करण्याचा सल्ला देतात. तरीही अनेकांना धूम्रपानाचे व्यसन जडते आणि ते चेन स्मोकर होतात. दिवसात एक किंवा दोन नव्हे तर 40 सिगारेट ओढणारी एक मादा चिम्पाझी देखील आहे. प्राणिसंग्रहालयात लोकांच्या मनोरंजनासाटी तिला सिगारेट ओढणे शिकविण्यात आले होते आणि मग तिला हळूहळू सिगारेट ओढण्याचे व्यसनच लागले. सध्या या मादा चिम्पाझीला पाहण्यासाठी अनेक लोक येत असतात. यामुळे ही मादा चिम्पाझी प्राणिसंग्रहालयाच्या आकर्षणाचे केंद्र राहते.
सिगारेट ओढणाऱया चिम्पाझीचे नाव अजालिया असून तिला कोरियन भाषेत ‘डैले’ नावाने पुकारले जाते. या मादा चिम्पाझीचे वय 25 वर्षे असून ती उत्तर कोरियाच्या प्योंगयांग प्राणिसंग्रहालयात आहे. अजालिया प्राणिसंग्रहालयात येणाऱया लोकांमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. ती एका दिवसात 40 सिगारेट ओढत होती आणि कुठल्याही चेन स्मोकरप्रमाणे सिगारेटचा धूर हवेत सोडत होती.
अजालियाला प्रशिक्षण देण्यात आल्याने ती लाइटरने सिगारेट पेटवायची आणि अन्य क्यक्तीकडून फेकण्यात आलेल्या सिगारेटपासून देखील सिगारेट शिलगावत होती. प्राणिसंग्रहालयात येणारे लोक तिला सिगारेट देत होते. अजालिया उत्तम नृत्य करू शकत असल्याने लोकांचे मनोरंजन देखील व्हायचे.
हत्ती, जिराफापेक्षाही लोकप्रिय

या प्राणिसंग्रहालयात हत्ती, जिराफ, पेंग्विन, गेंडे, ऊंट, गैलागोस, मासे, मगर, रॅटलस्नेक, बोआ कंस्ट्रिक्टर्स, कासव यासारखे अनेक प्राणी आहेत, परंतु या सर्वांमध्ये चिम्पाझी अत्यंत लोकप्रिय आहे. 2016 मध्ये किम जोंग उन यांच्या आदेशावर या प्राणिसंग्रहालयाचे नुतनीकरण करण्यात आले, ज्यानंतर अजालियाचे नाव चर्चेत आल्याने ती स्टार ठरली.
तक्रारीनंतर सोडविले धूम्रपान
लोकांच्या मनोरंजनासाठी एका चिम्पाझीला धूम्रपानाचे व्यसन लावणे चुकीचे असल्याचे पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ऍनिमल्सचे अध्यक्ष इंग्रिड न्यूकिर्क म्हणाले. अनेक तक्रारीनंतर अजालियाची धूम्रपानाची सवय सोडायला लावण्यात आली आहे.