अभिषेक बच्चन, यामी, निमरत झळकणार
अभिषेक बच्चन, यामी गौतम आणि निमरत कौर यांची महत्त्वाची भूमिका असलेला चित्रपट ‘दसवां’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘जरुरी नहीं जो इन्सान राजनीति में शानदार हो वो दसवीं कर ही ले’ असा डायलॉग या ट्रेलरमध्ये ऐकू येतो. तूषार जलोटा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या दसवीं चित्रपटात अभिषेक बच्चन जाट शैलीत दिसून येत आहे. दसवींची कहाणी हरियाणातील एका गावाची दर्शविण्यात आली असून ज्यात 8 वी पास मुख्यमंत्र्याला शिक्षक भरतीप्रकरणी तुरुंगात पाठविले जाते.

गंगाराम चौधरी ही भूमिका अभिषेकने यात साकारली आहे. तर त्याच्या पत्नीच्या भूमिकेत निमरत कौर आहे. यामी गौतमने आयपीएस अधिकाऱयाची भूमिका साकारली आहे. तुरुंगात असताना दहावी उत्तीर्ण होण्याचा निर्धार गंगाराम चौधरी करत असल्याचे ट्रेलरमधून स्पष्ट होते. अभिषेक, निमरत आणि यामी यांनी हरियाणवी शैली उत्तमरित्या साकारली आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.