चेन्नईहून परतला होता गावी – सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल
प्रतिनिधी / बेळगाव
चेन्नईहून बैलहोंगल तालुक्मयातील कलभांवी या आपल्या गावी परतलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी सायंकाळी राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटीनमध्ये ही माहिती देण्यात आली असून जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 303 वर पोहोचली आहे.
कलभांवी येथील 18 वषीय विद्यार्थ्याला शनिवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. हा विद्यार्थी दहावीत शिकत होता. 25 जूनपासून दहावीची परीक्षा होणार आहे. त्यासाठी सेवासिंधू ऍपच्यामाध्यमातून पास मिळवून तो गावी परतला होता.
सुट्टीत आपल्या नातेवाईकांच्या मुलांना सोडण्यासाठी हा मुलगा चेन्नईला गेला होता. लॉकडाऊनमध्ये तो तामिळनाडूतच अडकला. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सेवासिंधू ऍपच्या माध्यमातून गावी परतण्यासाठी त्याने ई-पास मिळविला. दहावी परीक्षेची तारीख निश्चित झाल्यानंतर तो घाईने येवून 1 जून रोजी आपल्या गावी पोहोचला.
त्याला 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. 16 जून रोजी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांनी त्याचे स्वॅब जमविले. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शनिवारी त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 303 वर पोहोचली आहे.
शुक्रवारी हुबळीहून बेळगावला आलेल्या युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दुसऱया दिवशी शनिवारी विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचा रुग्ण क्रमांक 8299 असा आहे. विद्यार्थ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर कलभांवी या गावात खबरदारी घेण्यात येत आहे.
हा 18 वषीय तरुण दहावीचा विद्यार्थी असला तरी गावातील अन्य विद्यार्थ्यांशी त्याचा संपर्क आला नाही. चेन्नईहून परतल्यानंतर त्याला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. कोरोनाची लागण झाल्यामुळे 25 जून पासून होणाऱयापरीक्षेत तो भाग घेवू शकत नाही. त्याच्या प्राथमिक संपर्कातील काही जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.