28 मार्च ते 11 एप्रिलपर्यंत परीक्षा
प्रतिनिधी / अथणी
दहावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था एसएमएसद्वारे आधीच कळविली जाणार आहे. कर्नाटक माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे. परीक्षेवेळी होणारी गर्दी आणि सामाजिक अंतर राखण्यासाठी आधीच विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईलवर एसएमएस अथवा व्हॉट्सऍपच्या माध्यमातून खोली नंबरची माहिती दिली जाणार आहे. याबरोबरच आरोग्य खात्याशी संपर्क करून प्रत्येक तालुक्मयाला एक फिरते आरोग्य सेवेचे वाहन तयार ठेवावे, प्रत्येक तालुक्मयाला एक कोविड केअर सेंटर तयार करून तेथे बाधित विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची व्यवस्था करावे. 28 मार्च ते 11 एप्रिलपर्यंत दहावी परीक्षा होणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परीक्षा मंडळाचे अध्यक्ष असलेले सार्वजनिक शिक्षण खात्याचे आयुक्त आर. विशाल यांनी अंतिम आदेश जारी केला आहे.
परीक्षेपूर्वी आणि परीक्षेनंतर खोली, स्वच्छतागृह आदी सॅनिटाईझ करण्यात येणार आहे, एका परीक्षा केंद्रावर 20 विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. याचबरोबर परीक्षार्थी कोविड रुग्ण असल्यास सदर विद्यार्थ्यांना आरोग्याधिकाऱयांचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. बाधित विद्यार्थी वैद्यकीय पथकासह रुग्णवाहिकेतून येऊन कोविड केअर सेंटरमध्ये परीक्षा देऊ शकतात.