साहित्य : 1 वाटी दही, अर्धी वाटी पनीर खिसून, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, अर्धा चमचा लसूण पाकळय़ा चिरून, चिमुटभर साखर, चवीपुरते मीठ, 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे बारीक चिरलेली पुदिना, 1 चमचा बडीशेप पावडर, 1 चमचा तूप, 2 चमचे भाजलेली चणाडाळ, 2 चमचे कॉर्नफ्लोर, तेल तळण्यासाठी
कृती : बाऊलमध्ये पनीर घेऊन त्यात दही, हिरवी मिरची, लसूण, साखर, मीठ, कोथिंबीर, पुदिना आणि बडीशेप पावडर घालून मिक्स करावे. भाजलेली चणाडाळ मिक्सरला लावून पावडर बनवून घ्यावी. गरम तुपात चणाडाळ पावडर टाकून दोन मिनिटे परतवावी. नंतर त्यात दही मिश्रण आणि कॉर्नफ्लोर टाकून मिश्रण शिजवून घ्यावे. तयार मिश्रण गार झाले की त्याचे एकसमान गोळे बनवून टिक्की बनवावी. आता कढईत तेल गरम करून मंद आचेवर तयार टिक्की सोनेरी रंगावर तळून पेपरनॅपकीनवर काढावी. आता तयार दही टिक्की सॉससोबत अथवा ग्रीन चटणीसोबत खाण्यास द्या.