ऑनलाइन टीम / मुंबई :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लाॅक डाऊन जारी करण्यात आली आहे. यामुळे सर्व व्यवहार बंद आहेत. मात्र जीवनावश्यक वस्तूं, सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत.
याच दरम्यान दादर येथे घाऊक भाजीपाला मार्केट सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. मात्र या मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने हे मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जीवनावश्यक वस्तू लोकांना मिळाव्यात म्हणून चार दिवसांपासून चार वेगवेगळ्या ठिकाणी पर्यायी मार्केट सुरू करण्यात आली. पण दादर येथील सेनापती बापट मार्गावरील मार्केटमध्ये गर्दी होत असल्याने हे मार्केट बंद करण्यात आले.
अन्य ठिकाणा वर सुरू करण्यात आलेली म्हणजेच दहिसर जकात, एम एम आर डी एक्झिबिशन सेंटर, मुलुंड जकात नाका आणि सोमय्या ग्राउंड येथे अजून गर्दी होत नसल्याने ही मार्केट अजून सुरू ठेवली आहेत.