प्रतिनिधी/ दापोली
शहरातील वृंदावन हॉटेलसमोर भले मोठे जुने आंब्याचे झाड कोसळून चार दुचाकी व दोन चारचाकी गाडय़ांचे अतोनात नुकसान झाले. हा प्रकार सोमवारी दुपारी घडला. झाड पडताना मोठा आवाज झाल्याने मात्र मोठा आवाज झाल्याने अनेकांनी सावध होऊन तेथून पळ काढला. यामुळे मोठी जीवितहानी टळली.
सोमवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अचानक मोठा आवाज करत शहरातील वृंदावन हॉटेलसमोरील मोठे आंब्याचे जुने झाड रस्त्यावर कोसळले. यावेळी रहदारीदेखील मोठय़ा प्रमाणात होती. मात्र मोठा आवाज झाल्याने अनेकांनी सावध होऊन तेथून पळ काढला. मात्र यात झाडाखाली उभ्या असणाऱया दापोली-हर्णे मार्गावरील चार दुचाकी व दोन चारचाकी गाडय़ांचे नुकसान झाले. यामुळे शहराचा वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता.
हे झाड पडल्यावर दापोली-हर्णे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. दापोली नगरपंचायतीच्या कर्मचाऱयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन झाड तोडून वाहतूक सुरळीत केली व झाडाखाली चक्काचूर झालेल्या गाडय़ा बाहेर काढल्या. हे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.